अमेरिकेवर कोसळला 1500 किलोचा आगीचा गोळा
अंतराळात चीनकडून मिळणाऱया आव्हानांमुळे अमेरिका त्रस्त आहे. चीनने अंतराळात मोठय़ा प्रमाणात कचरा केल्यामुळे अमेरिकेने अनेकदा टीका केली आहे. या स्पेस कचऱयाचा आणखी एक अनुभव मंगळवारी अमेरिकेला आला. चीनच्या स्पेस कचऱयाचा एक भलामोठा तुकडा पॅलिपहर्नियाच्या आकाशावर तुटला. चीनच्या ‘शेनझोऊ 15’ यानाचे वजन सुमारे 1500 किलोग्रॅम आहे. त्यामुळे एक लांब आगीचा गोळा सॅक्रामेंटो ते सॅन डिएगोपर्यंतच्या आकाशात कित्येक लोकांनी पाहिला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि सॅटेलाईट ट्रकर जोनाथन मॅकडॉवेल यांच्या माहितीनुसार, स्पेस भंगाराचा हा तुकडा चीनच्या ‘शेनझोऊ 15’ या
स्पेसक्रॉफ्टचे आर्बिटल मॉडय़ूलचा होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List