5 टी-20 सामन्यांसाठी महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ ढाका
या महिन्याच्या अखेरीस भारताचा महिला क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका उभय संघांत होणार आहे. 28 एप्रिल ते 9 मे या कालावधीत ही मालिका होईल.
बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय महिला संघ 23 एप्रिल रोजी बांगलादेशमध्ये दाखल होईल आणि 10 मे रोजी मायदेशी प्रयाण करेल. या मालिकेतील पहिला सामना 28 एप्रिल रोजी होईल 30 एप्रिल रोजी दुसरा सामना दिवस-रात्रीचा खेळविण्यात येईल. त्यानंतरचे सामने 2, 6 व 9 मे रोजी खेळविले जातील. यातील शेवटचा सामना डे-नाईट सामना असेल. मालिकेतील सर्व सामने सिल्हेतमध्ये खेळविले जातील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List