तैवानमध्ये भूपंपाचे जोरदार धक्के

तैवानमध्ये भूपंपाचे जोरदार धक्के

 

तैवानची राजधानी तैपेई बुधवारी जोरदार भूपंपाने हादरली. भूपंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी होती. या भूपंपात 9 जण ठार झाले असून 730 जण जखमी झाले आहेत. हा भूपंप 25 वर्षांतील सर्वात मोठा भूपंप आहे. तैवानच्या हुआलियनमधून भूपंपाचे अनेक पह्टो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळताना दिसत आहेत. भूपंपामुळे तैवानमध्ये इमारतींचे  मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. यानंतर देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

 

जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

या भूपंपामुळे लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले. अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. भूपंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ओकिनावा प्रांताच्या आसपासच्या किनारी भागासाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;