भाजपा नेत्यांचा उघडपणे संविधान बदलण्याचा डाव; व्हिडीयो शेअर करत काँग्रेसचा दावा

भाजपा नेत्यांचा उघडपणे संविधान बदलण्याचा डाव; व्हिडीयो शेअर करत काँग्रेसचा दावा

अनंत कुमार हेगडे यांच्यानंतर भाजपाचा आणखी एक नेता संविधान बदलण्यासाठी उघडपणे डाव रचत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. भाजपा नेत्या ज्योती मिर्धा यांचा एक व्हिडीयो काँग्रेसने शेअर केला आहे. देशाचे संविधान बदलण्यासाठी जाणूनबुजून रणनीती आखली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी राजस्थानच्या नागौर येथून भाजपा उमेदवार मिर्धा यांचा व्हिडीयो एक्सवरून शेअर केला आहे. बहुमत मिळवण्यासाठी मिर्धा संविधान बदलण्याबद्दल सांगताना दिसत आहेत, असा आरोप थरुर यांनी केला आहे. संविधान बदलण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत भाजपला बहुमत हवे असे मिर्धा सांगताना व्हिडीयोत दिसत आहेत, असे थरुर यांनी म्हटले आहे. दरम्यान, हा विचारपूर्वक रचलेला डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;