ग्रजीपेक्षा सर्वसामान्य, शेतकऱयांचे प्रश्न महत्त्वाचे! सुजय विखे यांना नीलेश लंके यांचे प्रत्युत्तर

ग्रजीपेक्षा सर्वसामान्य, शेतकऱयांचे प्रश्न महत्त्वाचे! सुजय विखे यांना नीलेश लंके यांचे प्रत्युत्तर

माझ्याबरोबर फाडफाड इंग्रजीची स्पर्धा लावा. तुम्ही जिंकलात तर मी लोकसभेचा अर्ज भरणार नाही, असे अजब आव्हान देणाऱया सुजय विखे-पाटील यांना सामाजिक भान जपत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नीलेश लंके यांनी प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा सर्वसामान्य आणि शेतकऱयांचे प्रश्न सोडवणे जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारा वेळी सर्वसामान्यांना भेडसावणाऱया समस्या, प्रश्न, सोयीसुविधा, लोकांसाठी विकासकामे काय करणार, हे मांडण्याऐवजी आता एकमेकांवर व्यक्तिगत कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. खासदारकी ही केवळ इंग्रजी बोलणाऱयांची जहागिरी असल्याच्या तोऱयात सुजय विखे-पाटील यांनी लंके यांना आव्हान दिले. नगरमध्ये माझी इंग्रजी तुझ्यापेक्षा चांगली आहे. त्यामुळे तुम्ही खासदार होऊ शकत नाही. खासदार मीच होणार आणि तुम्हाला खासदार व्हायचे असेल तर पहिल्यांदा माझ्याशी इंग्रजीतून भाषणाची स्पर्धा लावा. ती जिंकलात तर मग मीच खासदारकीचा अर्ज भरणार नाही, असे अजब आव्हान लंके यांना भर प्रचाससभेत दिले होते.

दोन्ही उमेदवार डॉक्टर

डॉ. सुजय विखे-पाटील न्युरोसर्जन आहेत. काही काळ त्यांनी प्रॅक्टीसही केली, तर डॉ. नीलेश लंके यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्यानंतर त्यांनी आयटीआय अभ्यासक्रम केला आहे. अलीकडेच त्यांनी मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली असून एका संस्थेने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. लंके यांचे समर्थक त्यांचा डॉक्टर असा उल्लेख करतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;