संजय सिंह तिहारमधून बाहेर
दिल्लीतील कथिक मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची आज सुटका करण्यात आली. बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, आनंदोत्सव साजरा करण्याची ही वेळ नाही. हा संघर्षाचा काळ असून आपले ज्येष्ठ नेते तुरुंगात आहेत. लवकरच तुरुंगाचे कुलूप तुटणार आणि सर्व नेत्यांची सुटका होणार, अशी प्रतिक्रिया संजय सिंह यांनी दिली.
त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते आपला तोडू पाहात आहेत, पण आम आदमी पार्टी आंदोलनाच्या मुशीतून तयार झाली असून आम्ही घाबरणार नाही. केजरीवाल अजिबात राजीनामा देणार नाहीत, असेही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List