लडाखमध्ये आता महिलांचे उपोषण; 10 दिवस करणार आंदोलन
लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा तसेच लडाखचा घटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्यासह ग्लोबल वार्ंमगच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांचे उपोषण केले. आता या आंदोलनाचा मोर्चा महिलांनी सांभाळला असून त्या 10 दिवसांचे उपोषण आंदोलन करणार आहेत. ‘लडाख वाचवा, लोकशाही वाचवा’ अशा घोषणा देत मोदी सरकारविरोधात जोरदार आंदोलन उभे राहिले आहे.
मुस्लिम महिलांचाही या आंदोलनात समावेश आहे. दिवसभर रोजे ठेवण्यात येतात. त्यामुळे मीठ आणि पाणीही घेत नसल्याचे आंदोलनकर्त्या महिला नसरीन यांनी सांगितले. या मुस्लिम महिला सूर्योदयापूर्वी मीठ आणि पाणी घेतात. सूर्यास्तानंतर अजिबात काहीच खात नाहीत, असे नसरीन यांनी सांगितले. सोनम वांगचुक यांनी केवळ मीठ आणि पाण्याचे सेवन करून 21 दिवसांचे उपोषण केले. 6 मार्चला सुरू केलेले हे उपोषण आंदोलन 26 मार्चला संपले.
सर्व धर्माच्या महिला एकवटल्या
लडाख वाचवण्यासाठी विविध धर्माच्या तब्बल 300 महिला उपोषण आंदोलनासाठी एकवटल्याचे चित्र आहे. लडाखमधील नागरिकांना नोकरी मिळावी, पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना करावी, लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, कारगील जिह्यात विविध लोकसभा मतदारसंघ तयार करावेत. दरम्यान, आंदोलनकर्त्यांशी पेंद्र सरकारने चर्चा करण्याचा प्रयत्न केला; परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List