पंतप्रधान नेतान्याहू यांच्याविरुद्ध जनतेचा उद्रेक, घरावर हल्ला

पंतप्रधान नेतान्याहू यांच्याविरुद्ध जनतेचा उद्रेक, घरावर हल्ला

गेल्या सहा महिन्यांपासून इस्त्र्ाायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. मात्र, आता इस्त्र्ाायलमध्येच ‘गृहयुद्ध’ सुरू झाले असून, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरुद्ध जनतेत संतापाचा उद्रेक सुरू आहे. एकाधिकारशाही कारभार आणि राजकीय फायद्यासाठी युद्धाचे भांडवल करणाऱया पंतप्रधान नेतान्याहू यांनी राजीनामा द्यावा यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. पेटत्या मशाली घेऊन लोकांनी पंतप्रधान निवासस्थावर धडक देत हल्ला केला आणि आत घुसण्याचा प्रयत्न केला. तेथेच तंबू ठोकून दीर्घ काळ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

इस्रायलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते अशी बेंजामिन नेतान्याहू यांची ओळख आहे. एकाधिकारशाही कारभार करणे, राजकीय विरोधकांना संपवणे, जनतेची दिशाभूल करणे ही नेतान्याहू यांची खरी ओळख आता इस्रायली जनतेला झाली आहे. 7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे.

ओलिसांची सुटका करा

ओलिसांची तत्काळ सुटका करण्यासाठी नेतान्याहू यांनी प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच, पंतप्रधान नेतान्याहू यांनी राजीनामा देऊन तत्काळ निवडणुका घ्याव्या, असा जनतेचा आग्रह आहे.

युद्ध थांबवा

पंतप्रधान नेतान्याहू हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी युद्धाचा वापर करीत आहेत, असा इस्रायली जनतेचा मुख्य आरोप आहे. हमासबरोबरच्या युद्धामुळे इस्रायलची मोठी हानी झाली आहे. हे युद्ध तत्काळ थांबवा. युद्धविराम करा, अशी आंदोलन करणाऱया जनतेची मागणी आहे.

– गेल्या चार दिवसांपासून इस्त्र्ाायली जनता रस्त्यावर उतरली आहे. मंगळवारी रात्री हजारो लोकांनी पंतप्रधान निवासस्थानावर धडक दिली. कडेकोट बंदोबस्ताचे कडे भेदून निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेकांच्या हातात पेटत्या मशाली होत्या. निदर्शकांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले, लाठीहल्ला केला. संतप्त जमावाने निवासस्थानाबाहेर तंबू ठोकले असून, आंदोलन दिवस-रात्र सुरूच आहे. दरम्यान, राजधानी तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्याविरुद्ध आंदोलनाचा भडका उडाला आहे. संसदेबाहेरही लोकांनी ठिय्या मांडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;