संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी आळंदी मंदिरात साजरी
आळंदीत सर्व संतांच्या पुण्यतिथी, समाधी सोहळे, जयंती सर्व समाज आणि वारकरी संप्रदाय यांचे माध्यमातून एकत्रित साजरे करण्याचे धोरण नुसार आळंदीतील माउली मंदिरातील विना मंडपात श्री संत एकनाथ महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अर्पण करून ह.भ.प एकनाथ महाराज शिंदे ( जालना ) यांचे कीर्तन हरिनाम गजरात झाले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी, वारकरी सेवा संघ, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सहकार्याने धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. यावेळी कीर्तनकार शिंदे महाराजांनी श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर आधारित भावीक भक्तांना नाथ महाराजांचे जीवनातील अनेक दाखले देऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नरहरी महाराज चौधरी, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था व वारकरी सेवा संघाच्या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, राजगड ( वेल्हे ) या तालुक्यांमध्ये श्री संत नाथ महाराजांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज मंदिरात यासाठी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष ह. भ.प मोहन महाराज शिंदे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवे, रवींद्र कुमकर, पृथ्वीराज कराळे, सोपान बुटले, विलास वाघमारे यांचेसह महिला भगिनी, वारकरी विद्यार्थी उपस्थित होते. माउली मंदिरात पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे कीर्तनकार शिंदे महाराज यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. भाविकांना यावेळी ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील भक्त निवासात महाप्रसाद देऊन सांगता झाली
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List