धक्कादायक! गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 नेत्यांचा भाजप प्रवेश, 12 नेते महाराष्ट्रातले
भ्रष्टाचारी नेते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाताच अगदी स्वच्छ होऊन बाहेर पडतात. त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या सर्व चौकश्या कारवाया थंड पडतात. गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेल्या 25 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गंभीर बाब म्हणजे या 25 पैकी 3 जणांना पूर्णपणे क्लिनचीट मिळाली आहे तर 20 जणांविरोधातील केसेस हे थंड बस्त्यात गेले आहेत. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले असून या वृत्तातून पार्टी विथ डिफरन्स व ना खाऊंगा ना खाने दुंगा अशा घोषणा देणाऱ्या भाजपचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला आहे.
2014 ला केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी 23 जणांना दिलासा मिळाला आहे. तीन जणांच्या केसेस पूर्ण बंद झाल्या आहेत तर वीस जणांच्या केसेस या थंड बस्त्यात गेल्या आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे या यादीत सर्वाधिक नेते हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रमधले या यादीत 25 पैकी तब्बल 12 नेते आहेत. 12 नेत्यापैकी 4 शिवसेना, 4 काँग्रेस, 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, असे या बातमीतून समोर आले आहे.
काही उदाहरणं
– अजित पवार याच्याविरोधात एनएसई बँकेच्या घोटाळ्यात आर्थिक गुन्हे विभागाने ऑक्टोबर 2020 मध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानंतर मिंधे सरकार आल्यानंतर या प्रकरणात पुन्हा तपास सुरू केला जाणार होता. मात्र अजित पवार मिंधे गटासोबत आल्यानंतर ईडीची या प्रकरणातील कारवाई बंद झाली आहे.
– तृणमूल काँग्रेसमध्ये असलेले सुवेंदू अधिकारी हे 2020 मध्ये भाजपमध्ये आले. चिटफंड घोटाळ्यात त्यांची चौकशी करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीची सीबीआय वाट पाहत आहे. परवानगी दिली तर आम्ही कारवाई करू.
– हेमंत बिस्वा यांच्यावर 2-14 मध्ये सीबीआय चौकशी व छापेमारीचा सपाटा सुरू होता. ज्या क्षणी ते भाजपात आले. तेव्हापासून त्यांच्याविरोधातील केस इंचभरही पुढे सरकलेली नाही.
– माजी काँग्रेस खासदार ज्योती मिर्धा व टीडीपी खासदार वाय एस चौधरी. ज्योती मिर्धा या आता राजस्थानच्या भाजपच्या उमेदवार आहेत.
– अजित पवार
ऑगस्ट 2019- मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा एफआयआर दाखल करते..
सप्टेंबर 2019- ईडी या आधारावर चौकशीला सुरुवात करते
ऑक्टोबर 2020- आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW क्लोजर रिपोर्ट सादर करते…
एप्रिल 2022- ईडी अजित पवारांचं नाव वगळून चार्जशीट दाखल करते
जून 2022- शिवसेना फूट, शिंदे फडणवीस सरकार
ऑक्टोबर 2022- EOW पुन्हा या प्रकरणात चौकशीची मागणी करते
जुलै 2023- अजित पवार राष्ट्रवादी फोडून भाजपसोबत, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात
जानेवारी 2024- आर्थिक गुन्हे शाखा आपला दुसरा क्लोजर रिपोर्ट सादर करते
सद्यस्थिती काय- ईडीनं सध्या हस्तक्षेप याचिका दाखल करुन ठेवली आहे..
– प्रताप सरनाईक
नोव्हेंबर 2020- आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरचा आधार घेत ईडीच्या धाडी पडतात
जानेवारी 2021- आर्थिक गुन्हे शाखा क्लोजर रिपोर्ट सादर करते
जून 2022- सरनाईक एनडीएसोबत सामील होतात सत्तेत
सप्टेंबर 2022- कोर्ट हा क्लोजर रिपोर्ट स्वीकार करतं… ईडीची केस नामंजूर करतं
सद्यस्थिती काय – पुढे या केसमध्ये काहीच कारवाई नाही, दुसऱ्या प्रकरणात केवळ चौकशी चालू आहे…
अशोक चव्हाण
डिसेंबर 2011- सीबीआय चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्या प्रकरणी केस दाखल करते
जुलै 2012- सीबीआय चव्हाण यांच्यावर आरोपपत्र दाखल करते
जानेवारी 2018- सुप्रीम कोर्टाकडून कारवाईसाठी स्थगिती
फेब्रुवारी 2024- भाजपमध्ये प्रवेश
सद्यस्थिती काय- केसवरची स्थगिती कायम आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List