Taapsee Pannu Wedding : लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत समारंभाचा व्हिडिओ व्हायरल

Taapsee Pannu Wedding : लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत समारंभाचा व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री Taapsee Pannu सध्या चर्चेत आहे ते लग्नामुळे. काही महिन्यांपूर्वी तापसीने तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नात फक्त कौटुंबिक सदस्य आणि त्यांचा जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. परंतु यांच्या लग्नाबाबत कोणतेही फोटो अथवा व्हिडिओ समोर आले नाही. आता हळूहळू यांच्या लग्नाबाबतच्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by LT (@ltwt2497)

अलीकडेच या जोडप्याच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तापसी पन्नू लाल रंगाच्या हेवी वर्क सूटमध्ये वधुच्या रूपात दिसत होती. आता अभिनेत्रीच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मथियास बो हा तापसीसोबत ‘जस्ट द वे यू आर’ या रोमँटिक गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यांचा लग्नसोहळा आनंदात आणि थाटात पार पडल्याचे दिसत आहे. तसेच तापसीची बहीण शगुन पन्नू हिनेही संगीत सोहळ्यात जोरदार डान्स केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavail Gulati (@pavailgulati)

तापसी आणि तिचा नवरा मॅथियास बो यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तापसी पन्नूचा ‘थप्पड’ मधील सह-कलाकार पावेल गुलाटी याने लग्नाचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये अभिनेता अभिलाष थापियाल देखील दिसले. मात्र, या जोडप्याने स्वत:हून अद्याप कोणतेही लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;