Photo : रुबीना दिलैकच्या काळ्या रंगाच्या कोट-पॅण्टने वेधले चाहत्यांचे लक्ष

Photo : रुबीना दिलैकच्या काळ्या रंगाच्या कोट-पॅण्टने वेधले चाहत्यांचे लक्ष

टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबीना दिलेक सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. रुबिना तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्समुळेही ओळखली जाते. लवकरच रूबिना पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. तिचा ‘चल भज्ज चलिये’ हा सिनेमा लवकरच येणार आहे. त्याआधी मंगळवारी या सिनेमाची तिच्या खास लोकांसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवली होती. त्यावेळी रूबिना सुंदर दिसत होती. तिने त्याचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने कोट पॅण्ट अशा पोशाख घातला आहे. रूबिनाने काळ्या रंगाचा कोट-पॅण्ट घातला होता. मात्र रूबिनाने कोट-पॅण्टच्या कमरेवर बांधलेल्या गुलाबी रंगाच्या रिबीनने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच रूबीनाने स्टायलिश आऊटफीटवर हाय हिल्स घातले होते. तर चेहऱ्यावर सटल ब्राऊन शेड मेकअपसोबत केसांच्या मधोमध भांग पाडून मोकळे ठेवले होते. तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;