Lok Sabha Election 2024 भावना गवळी यांचा पत्ता कट, राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा

Lok Sabha Election 2024 भावना गवळी यांचा पत्ता कट, राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा

शिवसेनेसोबत गद्दारी करून मिंधे सोबत गेलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातील विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याचे वृत्त आहे. भावना गवळी यांच्या जागी मिंधेंनी हिंगोलीतून उमेदवारी रद्द केलेले हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याचे समजते. त्यामुळे आता भावना गवळी काय करणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भावना गवळी या यवतमाळ वाशिम मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळ्या प्रकरणी ईडीने भावना गवळी यांना नोटीस बजावल्या होत्या. मिंधे गट जेव्हा शिवसेनेतून फुटला त्यावेळी शिवसेनेशी गद्दारी करून भावना गवळी मिंधे गटात सामील झाल्या होत्या. त्यानंतर भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी देखील बांधली होती.

मात्र लोकसभा निवडणूकीची चर्चा सुरू झाल्यापासून भावना गवळी यांनी स्वत:च्या उमेदवारीसाठी तयारी मोर्चेबांधनी सुरू केली होती. मात्र भावना गवळी यांना त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते याची शंका आल्यापासून त्या मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;