Lok Sabha Election 2024 : भाजपच्या दबावानंतर मिंधेंवर हिंगोलीत उमेदवार बदलण्याची नामुष्की, हेमंत पाटलांचे तिकीट कापले

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या दबावानंतर मिंधेंवर हिंगोलीत उमेदवार बदलण्याची नामुष्की, हेमंत पाटलांचे तिकीट कापले

हिंगोली मतदारसंघातून मिंधे गटाने जाहीर केलेले उमेदवार हेमंत पाटील यांना भाजपने जोरदार विरोध केल्याने मिंधे गटावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता. या विरोधातून गेल्या काही दिवसांपासून हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिंदेसेनेचा उमेदवार बदलला जावा यासाठी युद्धपातळीवर हालचाली सूरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री हेमंत पाटील हे त्यांच्या दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन वर्षावर पोहोचले होते. तिथे एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांचे तिकीट कापले जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हेमंत पाटील कार्यकर्त्यांना घेऊन वर्षावरून निघाले. मात्र काही तासातच हेमंत पाटील यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आले.

यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे देखील तिकीट मिंधे गटाकडून कापण्यात आल्याच बोलले जात आहे. भावना गवळी यांच्या मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच या संजय राठोड हे देखील या मतदारसंघातून इच्छूक असल्याचे समजते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;