आयफोन, आयपॅड हॅक होऊ शकतं, केंद्र सरकारचा अॅपलच्या ग्राहकांना गंभीर इशारा

आयफोन, आयपॅड हॅक होऊ शकतं, केंद्र सरकारचा अॅपलच्या ग्राहकांना गंभीर इशारा

हॅक होणार नाही, अशी ख्याती असलेल्या अॅपलच्या फोन आणि मॅकबुकसाठी केंद्र सरकारने एक गंभीर इशारा दिला आहे. आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक हे हॅक होऊ शकतं, असा इशारा सरकारने दिला आहे.

केंद्राच्या सिक्युरिटी अॅडवायजरी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने अॅपल आयफोन, आयपॅड, मॅकबुक आणि व्हिजन प्रो हेडसेट या अॅपल निर्मित उत्पादनं हॅक होऊ शकतात असं म्हटलं आहे. या टीमने दिलेल्या इशाऱ्यानुसार, अॅपलच्या उत्पादनांमध्ये एक मोठा दोष आढळला आहे. त्यामुळे डेटा लीक होण्याची शक्यता आहे. या दोषाला रिमोट कोड एक्झिक्युशन असं नाव देण्यात आलं आहे.

या दोषामुळे अॅपलच्या काही व्हर्जन्सना डेटा लीक होण्याचा धोका संभवत आहे. यात 17.4.1 पूर्वीचं Apple Safari व्हर्जन, 13.6.6 पूर्वीचं Apple macOS वेंचुरा व्हर्जन आणि 14.4.1 पूर्वीचं Apple macOS सोनोमा व्हर्जन यांचा समावेश आहे. यासोबत 1.1.1पूर्वीचं अॅपल व्हिजन ओएस, 17.4.1 पूर्वीचं अॅपल आयओएस आणि ओएस आयपॅड व्हर्जन देखील प्रभावित होऊ शकतात.

तसंच, iPhone XS, iPad Pro 12.9-इंच, iPad Pro 10.5-इंच, iPad Pro 11-इंच, iPad Air, iPad आणि iPad Mini यांनाही हा धोका संभवत आहे. त्यामुळे ताबडतोब त्यांनी Apple iOS, iPadOS, macOS आणि VisionOS यांचे नवीन व्हर्जन अपडेट करावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. त्याखेरीज सार्वजनिक वायफाय नेटवर्कचा वापर करू नये. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करावेत, फक्त अॅपल अॅप्लिकेशन स्टोअरमधूनच अॅप्स आणि सॉफ्टवेअर डाऊनलोड करावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;