युद्धाचं भांडवल केल्यामुळे नेत्यानाहूंविरोधात इस्रायली जनतेचा उद्रेक
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे देशातील युद्ध परिस्थितीचे त्यांच्या राजकीय फायद्यासाठी भांडवल करत आहेत. त्या विरोधात इस्त्रायलमधील जनतेत नेत्यानाहूविरोधात मोठा असंतोष पसरला असून गेल्या तीन दिवसांपासून हजारो आंदोलक नेत्यानाहूंच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. ”नेत्यानाहू हे युद्धाचा त्यांच्या राजकीय करिअऱ साठी फायदा करून घेत असून त्यांना पंतप्रधान पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या जेरुसलेम येथील शासकीय निवासस्थानाबाहेर रविवारपासून हजारो आंदोलक आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी पंतप्रधान निवसास्थानाबाहेरच तंबू ठोकले असून ते दिवस रात्र तिथे नेत्यानाहू यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. ”देशाचे पंतप्रधान हे त्यांच्या राजकीय फायद्यासाठी युद्धाचं भांडवल करत आहेत. हमास व गाझापट्टीतील दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या आमच्या लोकांना परत आणण्यासाठी नेत्यानाहू सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीए. त्यामुळे नेत्यानाहू यांनी राजीना द्यावा व देशात लवकरात लवकर नव्याने निवडणूका घ्याव्यात’, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. हमासच्या कैदेत अद्याप 130 इस्राईली नागरिक बंधक म्हणून आहेत. त्यांना सोडवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करावे अशी देखील मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे.
मंगळवारी शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. पोलिसांनी या आंदोलकांना तेथून उठवण्यासाठी त्यांच्यावर घाणेरड्या पाण्याचे फवारे मारले. त्यानंतर पोलीस व आंदोलकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी पोलिसांच्या या दडपशाहीचा विरोध करत उत्तर दक्षिण महामार्ग रोखले होते. या वेळी झालेल्या लाठिचार्ज व हाणामारीत आतापर्यंत सहा पोलीस अधिकारी व काही आंदोलन जखमी झालेले. सदर आंदोलक हे गेट तोडून नेत्यानाहू यांच्या निवासस्थानात घुसुत होते असा आरोप पोलिसांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List