MHT CET 2024 : महाराष्ट्र सीईटीने परीक्षांच्या तारखांमध्ये केला बदल, वाचा कोणकोणत्या तारखा बदलल्या…

MHT CET 2024 : महाराष्ट्र सीईटीने परीक्षांच्या तारखांमध्ये केला बदल, वाचा कोणकोणत्या तारखा बदलल्या…

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश (सीईटी सेल) परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. पीसीबी ग्रुप आणि पीसीएम ग्रुपच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. बदल करण्यात आलेल्या तारखांनुसार एमएचटी सीईटी पीसीबी ग्रुपची परीक्षा 22, 23, 24, 28, 29 आणि 30 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. पीसीएम ग्रुपची परीक्षा 2, 3, 4, 9, 10, 11, 15, 16 आणि 17 मे 2024 रोजी होणार आहे.

पीसीबी आणि पीसीएम या परीक्षांच्या तारखांसोबतच सीईटीच्या इतर परीक्षांच्या तारखांमध्ये सुद्धा बदल केला आहे. महाराष्ट्र एएसी सीईटी परीक्षा 12 मे रोजी होणार आहे. तर, महाराष्ट्र बीए/बीएससी, बीएड सीईटी आणि एलएल 5 वर्षीय सीईटी या सर्व परीक्षा 18 मे रोजी घेतल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र नर्सिंग सीईटी परीक्षा 24 आणि 25 मे 2024 रोजी होणार आहे. तसेच महाराष्ट्र बीएचएमसीटी सीईटी परिक्षा 22 मे रोजी घेतली जाणार आहे. या सर्व परिक्षांसबोतच महाराष्ट्र बीबीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएमसीई या परिक्षा 27 आणि 29 मे रोजी घेतल्या जाणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;