Malegaon blast trial: भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर सुनावणीस गैरहजर; न्यायालयाचे ताशेरे
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात न्यायालयात गैरहजर राहिल्याबद्दल NIA न्यायालयानं भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर ताशेरे ओढले.
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मुंबईतील विशेष न्यायालयाने भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यावर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत.
ठाकूर मालेगाव खटल्यातील प्रमुख आरोपी आहेत, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव बुधवारी सुनावणीला हजेरी लावली नाही. विशेष राष्ट्रीय तपास संस्था (NIA) न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवले की प्रज्ञा ठाकूर यांची सततची अनुपस्थिती खटल्यात अडथळा आणत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List