जगातल्या सर्वात वृ्द्ध व्यक्तीचा मृत्यू, 114 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जगातल्या सर्वात वृ्द्ध व्यक्तीचा मृत्यू, 114 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. साऊथ अमेरीकेतील वेनेजुएला येथे ही व्यक्ती राहत असून 114 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादपरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली आहे. जुआन विसेंट पेरेज मोरा यांचा 114 व्या वर्षी निधन झाले आहे. जुआन यांचे 4 जानेवारी 2022 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातली सर्वात जास्त वयाची वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले होते. त्यावेळी ते 112 वर्ष 253 दिवसांचे होते. जुआन यांचा जन्म 27 मे 1909 रोजी वेनेजुएलच्या ताचिरा राज्यात झाला होता. जुआन यांना 11 मुलं, 41 नातवंडे आणि 18 पतवंडे आहेत. तर त्यांच्या पतवंडांनाही 12 मुलं आहेत.

वेनेजुएला यांच्या ताचिरा राज्यातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वयोमानानुसार उच्च रक्तदाब आणि ऐकू कमी येण्याचा त्रास होता. त्या व्यतिरिक्त ते स्वस्थ होते आणि ते कोणतंही औषध घेत नव्हते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारा शेअर केलेल्या माहितीत त्यांनी स्वत:ला काही सवयी लावल्या होत्या. रोज कठोर परिश्रम, सुट्टीत आराम करायचा आणि नियमित देवपूजा करायचे. या सवयींनी त्यांचे आरोग्य निरोगी होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;