ज्या शिवसैनिकांमुळे श्रीकांत शिंदे खासदार झाले तेच आता त्यांना पाडणार, वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास

ज्या शिवसैनिकांमुळे श्रीकांत शिंदे खासदार झाले तेच आता त्यांना पाडणार, वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लोकसभेसाठी बुधवारी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. ”ज्या शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे, कामामुळे श्रीकांत शिंदे खासदार झाले आता तेच शिवसैनिक त्यांना पाडतील”, असा विश्वास वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

”उद्धव ठाकरेंनी माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीवर विश्वास दाखवला. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. समोर कल्याण लोकसभा नेहमी शिवसेनेच्या पाठिशी उभी राहिलेली आहे. यावेळेसही राहणार. श्रीकांत शिंदे हे देखील कधीतरी सामान्य होतेच. आम्हीच त्यांना निवडून दिलं. आम्हीच त्यांच्यासाठी काम केलं. ज्या शिवसैनिकांमुळे श्रीकांत शिंदे खासदार झाले तेच आता त्यांना पाडणार”, असे वैशाली दरेकर म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. ठाणे आणि कल्याणवरून महायुतीत प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत. ठाण्यावर भाजपने आपला दावा सांगितल्याने मिंधे गटाच्या तंबूत अस्वस्थता पसरली असून ठाण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत कल्याणची उमेदवारी जाहीर न करण्याचा निर्णय मिंधे गटाने घेतला आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याणच्या उमेदवाराचे नाव पहिल्या यादीत जाहीर न करण्याची नामुष्की मिंध्यांवर ओढवली आहे.

बुधवारी कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. हातकणंगलेमध्ये सत्यजीत पाटील यांना उमेदवारी, पालघरमध्ये भारती कामडी तर जळगावमधून करन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;