सोन्याला पुन्हा झळाळी, नोंदवला विक्रमी दर; लवकरच गाठणार 75 हजाराचा टप्पा

सोन्याला पुन्हा झळाळी, नोंदवला विक्रमी दर; लवकरच गाठणार 75 हजाराचा टप्पा

शेअर बाजारातील चढउताराचा परिणाम सोन्याच्या दरावरही होत असतो. आता शेअर बाजारात चांगलीच तेजी आहे. शेअर बाजारात तेजी असताना सोन्याचे दर घसरतात. मात्र, बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असताना सोन्याचे दरात वाढ होते. मात्र, आता शेअर बाजारासह सोन्यालाही झळाळी मिळाली आहे. सध्या सोन्याने विक्रमी पातळी गाठली असून 10 ग्रॅमसाठी 71 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या तीन-चार दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात सोने 75 हजाराचा टप्पा गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

सोन्याच्या दराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आता उन्हाळी सुट्ट्यांचा काळ सुरू होणार आहे. या काळात लग्नसराई असते. त्यामुळे या काळातच मोठ्या प्रमाणात सोने-चांदी आणि अलंकारांची खरेदी होत असते. मात्र, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने अनेकांनी सोने खरेदी टाळली आहे. सराफा बाजाराप्रमाणे वायदे बाजारातही सोन्या-चांदीचे दर वधारले आहेत. सोन्या-चांदीला चांगले दर मिळत असल्याने सोन्या-चांदीत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. आगामी काळात लग्नसाईचा हंगाम असल्याने तसेच निवडणुकांचा काळ असल्याने सोन्याचे दर 75 हजाराचा टप्पा गाठतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;