Lok Sabha Election 2024 : वायनाडमधून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी वायनाडमधून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी रोड शो केला. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. तसेच राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला संबोधित करत संदेश दिला. तुम्ही मला खासदार म्हणून निवडत प्रेम, स्नेह आणि सन्मान दिला. तुम्ही मला तुमच्या परिवारातील सदस्य म्हणून स्विकारले, असे राहुल गांधी म्हणाले.
आपण पाच वर्षांपूर्वी येथे आलो तेव्हा येथील जनतेने खासदार म्हणून आपली निवड केली. या काळात आपल्याला सन्मान दिला. प्रेम आणि स्नेह दिले. पहिल्यांदा आपण येथे आलो तेव्हा पूराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एवढ्या मोठ्या संकटाला जनता धैर्याने सामोरे जात होती. आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण होत नव्हते. येथील जनतेने आपल्याला दिलेला सन्मान आणि स्नेह आपल्या नेहमी स्मरणात राहील, असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रियंका गांधी यांनी ट्विट करत राहुल यांना शुभेच्छा दिल्या आणि भाजपवर निशाणा साधला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List