सुशील कुमार मोदी यांना कॅन्सर; आपली वेदना शेअर करत लिहिले- ‘PM ना सगळं सांगितलंय’

सुशील कुमार मोदी यांना कॅन्सर; आपली वेदना शेअर करत लिहिले- ‘PM ना सगळं सांगितलंय’

बिहारचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांनी सोशल मीडिया साईट ‘एक्स’वर याबाबत भावूक पोस्ट शेअर करत, यावेळी लोकसभा निवडणुकीत काही करू शकत नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुशील कुमार मोदी यांनी ‘एक्स’वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ”गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंझ देत आहे. आता वाटले लोकांना सांगण्याची ही योग्य वेळ आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत मी काही करू शकत नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व कळवले आहे. बिहार आणि पक्षाचा मी कायम आभारी असेन.”

बिहारचे उपमुख्यमंत्री असण्यासोबतच ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. मात्र, यंदा पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले नाही. सुशील कुमार मोदी हे बिहारच्या अर्थमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री या व्यतिरिक्त राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. 5 वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते.

सुशील कुमार मोदी यांचा जन्म जानेवारी 1952 मध्ये पाटणा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सेंट मायकल स्कूलमध्ये झाले. त्यांनी पाटणा येथील बीएन महाविद्यालयात बीएससीची डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी जय प्रकाश नारायण यांच्यापासून प्रभावित होत यांनी चालवलेल्या आंदोलनात सहभागी झाले. 1990 मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण करत पाटणा सेंट्रल विधानसभेतून निवडणूक लढवली होती. तो आता कुम्हार विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 2004 मध्ये ते भागलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत लोकसभेचे सदस्य झाले. यानंतर त्यांनी बिहारच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;