April Fool करणे जीवावर बेतले, गळफास लावत मित्राला केला होता व्हिडीओ कॉल

April Fool करणे जीवावर बेतले, गळफास लावत मित्राला केला होता व्हिडीओ कॉल

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. मित्राला एप्रिल फूल बनवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल लावून गळफास घेत असल्याची मस्करी करता करता स्टूलावरुन निसटला आणि गळफास बसून त्याचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशमधल्या इंदूर येथील मल्हारगंज परिसरात ही घटना घडली आहे. अभिषेक रघूवंशी (18) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दहावीत शिकत होता. एक एप्रिलला घरात असताना त्याच्या डोक्यात आपल्या मित्राला एप्रिल फूल बनविण्याची भन्नाट कल्पना आली. त्याने त्यासाठी घरातल्या पंख्यांला दोरखंड बांधून फास तयार करुन गळ्यात घातला आणि स्टूलवर उभा राहून त्यानंतर मित्राला व्हिडीओ कॉल करुन आपण गळफास घेत असल्याचे त्याने भासवले. मित्राला खरे वाटल्याने त्याने त्याला हे असे काही करु नको असे सांगत राहिला. पण बोलता बोलता अभिषेकच्या पायाखालचा स्टूल निलसटला आणि त्याला गळफास बसला.

जीव वाचवण्यासाठी अभिषेकने धडपड केली, पण त्याला मजबूत गळफास बसला आणि त्याने जीव गमावला. मित्राचे वेळ न घालवता तत्काळ पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मल्हारगंज पोलीस अभिषेकच्या घरात दाखल झाले. पोलिसांनी याची माहिती अभिषेकच्या कुटुंबियांनाही दिली. त्यांनी तत्काळ अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपाचाराआधीच अभिषेकचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अभिषेकच्या रुमती झडती घेत त्याचा रुम सील केला. तसेच त्याचा मोबाईलही तपासासाठी घेतला आहे. त्यामुळे खरंच एप्रिल फुल करताना अभिषेकचा मृत्यू झाला की यामागे घातपात आहे याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;