‘अबोली’ मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची होणार एण्ट्री

‘अबोली’ मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची होणार एण्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अबोलीच्या वडिलांनी म्हणजेच प्रतापरावांनी मनवावर अतिप्रसंग केला. या धक्कादायक प्रसंगामुळे मनवा खचून गेली. मनवाच्या या कठीण प्रसंगात अबोली तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. मनवावर झालेल्या अतिप्रसंगानंतर अबोलीने तिला न्याय मिळवून द्यायचाच असं ठाम ठरवलं आहे. यासाठी ती वडिलांच्याही विरोधात जाणार आहे. मनवाच्या बाजूने ती कोर्टात वडिलांच्या विरोधात केस लढणार आहे.

वडिलांना त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा मिळावी म्हणून अबोलीने अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. अबोलीचा हा प्रवास वाटतो तितका मात्र सोपा नाही. सुप्रसिद्ध वकील देवदत्त खांडेकर अबोलीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. प्रतापरावांच्या बाजूने केस लढून ते अबोलीला नवं आव्हान देणार आहेत. देवदत्त खांडेकर अत्यंत नामांकित वकील आहेत. आजवर एकही केस ते हरलेले नाहीत. त्यामुळे ही केसही आपणच जिंकणार याचा त्यांना ठाम विश्वास आहे. केस जिंकण्यासाठी ते कोणतीही गोष्ट करु शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सामोपचाराने गोष्टी होत नसतील तर पैसे देऊन केस मागे घ्यायला लावायची यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. मनवालाही पैसे देऊन गप्प करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र अबोली त्यांचा हा डाव उधळून लावणार आहे. “बाईची अब्रु पैशात तोलू नका. जेव्हा जेव्हा स्त्रीच्या अब्रुला हात लावलाय, तेव्हा तेव्हा महाभारत घडलं आहे. त्यामुळे आता महाभारत कोर्टात घडणार”, असं ठमकावून सांगत अबोलीने देवदत्त खांडेकरांचं आव्हान स्वीकारलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग वकील देवदत्त खांडेकरांच्या भूमिकेत दिसणार आहेत. खलनायकाची भूमिका म्हटलं की अनंत जोग यांचं नाव आपसुकच डोळ्यासमोर येतं. अनंत जोग यांनी आजवर अनेक हिंदी मराठी मालिका, सिनेमे, वेब सीरिजच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. अबोली मालिकेत ते साकारत असलेलं वकील देवदत्त खांडेकर हे पात्र देखील मालिकेत नवी उलथापालथ घडवणार आहे. अबोली ही मालिका रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;