तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर…! रोहित पवारांचा सुजय विखेंना सल्ला
Lok Sabha Election 2024: भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी काल महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना आव्हान दिलं होतं आणि ‘तुम्ही मला ही भाषा बोलून दाखवा मी निवडणूक लढवणार नाही’ असं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यावर राजकीय घमासान आता सुरू झालं आहे. जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विखेंच्या या वक्तव्याला जोरदारपणे उत्तर दिलं आहे.
‘भाषा किंवा शिक्षण यावरून कर्तृत्व सिद्ध होत नाही टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी टीका केली आहे’, असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे. ‘तुमच्या सर्वोच्च नेत्याला हा प्रश्न करू नका नाहीतर तुमचे बारा वाजतील’, असा सूचक इशारा सुद्धा त्यांनी मोदींचं नाव न घेता दिला आहे. रोहित पवार यांनी X वर सुजय विखे यांचा व्हिडीओ ट्विट करत त्यावर एक पोस्ट लिहिली आहे.
लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता… pic.twitter.com/TwqLSB43KH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 3, 2024
या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, ‘लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. असो! भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो.. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील!’
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List