9 लाख 84 हजार विद्यार्थी आधारविना
राज्यातील तब्बल 4 लाख 28 हजार 814 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध आहेत, तर 5 लाख 54 हजार 837 विद्यार्थ्यांची शाळेकडे उपलब्ध असलेली माहिती व आधारवरील माहिती यात विसंगती आढळून आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 9 लाख 83 हजार 651 विद्यार्थी आधार क्रमांकविनाच आहेत. या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी शाळास्तरावर मोहीम सुरू असून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी अनेक तांत्रिक समस्या शाळांना भेडसावत आहेत. विद्यार्थ्यांचा न जुळणारा डाटा, पालकांकडे असलेल्या चुकीच्या नोंदी यामुळे अनेकदा प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांचे आधारकार्ड निघत नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे.
शाळांमध्ये आता उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची प्रक्रिया पुन्हा थांबणार आहे. शालेय शिक्षण विभागाने अनेकदा मुदत देऊनही शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. आधार क्रमांक अवैध असलेले सर्वाधिक विद्यार्थी हे ठाणे जिह्यात असून येथील सुमारे 2 लाख विद्यार्थी आधारविना आहेत.
आधार अवैध ठरण्याची कारणे
विद्यार्थ्यांचे नाव, निवासाचा पत्ता, लिंग याबाबत शाळेतील नोंदी आणि आधारकार्डावरील नोंदी यात तफावत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरले आहेत. तसेच सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचा डाटा सेव्ह करताना अनेक समस्या उद्भवतात. दरवर्षी मॅन्युअली अपडेट करणे आवश्यक आहे. तांत्रिक समस्या दूर करणे आवश्यक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List