धावत्या एक्स्प्रेसमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म; टीसीच्या प्रसंगावधानाने बाळ-बाळंतीण सुखरुप

धावत्या एक्स्प्रेसमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म; टीसीच्या प्रसंगावधानाने बाळ-बाळंतीण सुखरुप

LTT-Prayagraj Duronto Express एक अनोखी घटना घडली आहे. बुधवारी सकाळी प्रसूती वेदनेने कण्हत असलेल्या महिलेने तिकीट तपासनीस आणि सहप्रवाशांच्या मदतीने एलटीटी प्रयागराज दुरंतो  एक्सप्रेसमध्येच बाळाला जन्म दिला. याबाबत मध्य रेल्वेने ट्विट करत तिकीट तपासकांसह सहप्रवाशांच्या सहकार्याबद्दल कौतुक  केले आहे. शिवाय बाळ आणि बाळंतीण दोघंही सुखरुप असल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.

बुधवारी LTT-Prayagraj Duronto Express मध्ये एक गरोदर महिला प्रवास करत होती. अचानक तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. ती वेदनेने विव्हळत असताना रेल्वेतील तिकीट तपासनीस आणि सहप्रवासी तिच्या मदतीसाठी पुढे आले. तिकीट तपासनीसांनी महिलेला प्रसूतीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पुरविल्या आणि सहप्रवाशांच्या मदतीने महिलेने रेल्वेतच बाळाला जन्म दिला. नंद बिहारी मीना, आलोक शर्मा, राजकरण यादव आणि इंद्र कुमार मीना या व्यक्तींच्या तिकीट तपासनीसांच्या तत्परतेमुळे आणि आवश्यक सहाय्य केल्यामुळे महिलेची प्रसूती सुखरुप झाली. आई आणि नवजात शिशू दोघांची सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित झाले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


प्रसंगावधान राखत तिकीट तपासकांनी सहप्रवासी महिलांची मदत घेऊन प्रसूत महिलेची व बाळाची सुखरूप सुटका मध्य रेल्वेने ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे. शिवाय देशभरातून त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;