हिंदुस्थानात साडी कॅन्सरचा धोका वाढला!
हिंदुस्थानातील महिला मोठय़ा प्रमाणात साडी नेसतात. साडी नेसल्याने कॅन्सर होतो. ऐकून धक्का बसला ना…फक्त साडीच नाही, तर अन्य कपडेही चुकीच्या पद्धतीने वापरल्यास कॅन्सर होऊ शकतो. त्याला वैद्यकीय भाषेत ‘स्कॅमस सेल कार्सिनोमा’ असे म्हणतात. या आजाराचे रुग्ण हिंदुस्थानात सर्वात जास्त आहेत.
साडी नेसताना महिला सुती पेटीकोट कमरेभोवती नाडीने/सुती धाग्याने बांधतात. जर एखाद्या महिलेने एकच कापड खूप वेळ घातले तर ते कमरेला घर्षण करतात. त्यामुळे तिथली त्वचा सोलून काळी पडू लागते. त्यामुळे साडी कॅन्सरचा धोका वाढू शकतो. शरीराच्या ज्या भागामध्ये अधिक प्रमाणात उष्णता आणि घाम येतो तेथे कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असे दिल्लीच्या पीएसआरआय हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. विवेक गुप्ता यांनी सांगितले. बिहार आणि झारखंडमधून या आजाराची प्रकरणे दिसून येत असल्याची त्यांनी सांगितली.
– अभ्यासानुसार हिंदुस्थानी महिलांमध्ये आढळलेल्या एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी एक टक्का प्रकरणे साडी कॅन्सरची आहेत. मुंबईतील आर. एन. कूपर हॉस्पिटलमध्येही याबाबत संशोधन करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List