इफ्तार पार्टीत दिसून आलं अरबाज-शुराचं प्रेम; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

इफ्तार पार्टीत दिसून आलं अरबाज-शुराचं प्रेम; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शुरा खान हे लग्न झाल्यापासून अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. अरबाज आणि शुरा आता पापाराझींची आवडती जोडी ठरली आहे. कॅफे असो, रेस्टॉरंट असो किंवा इतर कुठेही… या दोघांची केमिस्ट्री पापाराझी त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये कैद करतात. नुकतेच हे दोघं मुंबईतील प्रसिद्ध मोहम्मद अली रोड याठिकाणी इफ्तार पार्टीसाठी आले होते. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरबाज आणि शुरा यांनी रोजा सोडला आणि त्यानंतर एकमेकांना घास भरवला. इतकंच नव्हे तर यावेळी शुरा अरबाजची अत्यंत प्रेमाने काळजी घेताना दिसली. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

मंगळवारी पापाराझींनी इन्स्टाग्रामवर अरबाज आणि शुराचे काही व्हिडीओ पोस्ट केले. अरबाज हा इंडस्ट्रीतील त्याच्या काही सेलिब्रिटींसोबत इफ्तार पार्टीत सहभागी झाला होता. त्याच्यासोबत पत्नी शुरासुद्धा होती. रमजानच्या महिन्यात मुंबईतील मोहम्मद अली रोडवर प्रचंड गर्दी असते. अनेकजण तिथे विविध पदार्थ खाण्यासाठी आणि इफ्तार पार्टीसाठी येतात. अशातच जेव्हा अरबाज तिथे शुरासोबत पोहोचला, तेव्हा या दोघांभोवती लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीतून शुराला वाचवत अरबाजने पुढे नेल्याचंही व्हिडीओत पहायला मिळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

आणखी एका व्हिडीओमध्ये अरबाजच्या तोंडावर काही लागलं असताना शुरा अत्यंत प्रेमाने तिच्या हाताने पुसताना दिसतेय. इफ्तार पार्टीदरम्यान दोघं एकमेकांची खास काळजी घेताना दिसले. या दोघांमधील प्रेम आणि काळजी या व्हिडीओत सहज पहायला मिळतेय. या व्हिडीओवर कमेंट करताना काहींनी या जोडीचं कौतुक केलंय तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘पती-पत्नी कमी आणि बापलेकीची जोडी जास्त वाटतेय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हा दिखावा बंद करा’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी अरबाज खानने शुराशी निकाह केली. बहीण अर्पिताच्या घरीच हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला होता. या निकाहला कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते. शुरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असून तिचे 13.2 हजार फॉलोअर्स आहेत. शुराने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलंय. अरबाज आणि शुराची पहिली भेट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;