धैर्यशील पाटील यांचा भाजपने केला पोपट, लोकसभेचे गाजर दाखवून पक्षात घेतले आणि तटकरेंच्या प्रचाराला जुंपले

धैर्यशील पाटील यांचा भाजपने केला पोपट, लोकसभेचे गाजर दाखवून पक्षात घेतले आणि तटकरेंच्या प्रचाराला जुंपले

रायगड लोकसभेची उमेदवारी तुम्हालाच देऊ, असे सांगून भाजपने शेकापचे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना फोडले. भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर धैर्यशील पाटील यांनी जिल्ह्यात बैठकांचा धडाका लावत तटकरेंविरोधात रान उठवले. मात्र ऐनवेळी भाजपने पाटील यांचा पोपट करत त्यांना सुनील तटकरे यांच्या प्रचाराला जुंपले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून उघडपणे तटकरेंविरोधात बेडकी फुगवणाऱ्या धैर्यशील पाटील यांना तटकरेंसमोरच आता मान तुकवून प्रचार करावा लागत असल्याने भाजपवाल्यांची अवस्था ‘सहन होईना आणि सांगता येईना’ अशी झाली आहे. सत्ता आणि यंत्रणांना हाताशी धरून भाजपने संपूर्ण राज्यात फोडाफोडी सुरू केली आहे. पेणमध्येदेखील माजी आमदार धैर्यशील पाटील यांना खासदारकीचे गाजर दाखवून भाजपमध्ये घेतले. दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्ष पदाची ‘सुभेदारी’ देऊन भाजपने त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

नेत्यांच्या उपस्थितीत फुंकले होते रणशिंग

‘सागर’ बंगल्यावरील आदेशानुसार धैर्यशील पाटील जिल्हाभरात बैठका घेऊन तटकरेंना उमेदवारी देणे कसे अयोग्य आहे.. भाजपची मते अधिक असल्याने आपला उमेदवार कसा विजयी होईल याची गणिते ते पक्षश्रेष्ठींसमोर मांडत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण तसेच भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्येच तटकरेंविरोधात रणशिंग फुंकण्यात आले. परंतु ऐनवेळी रायगडची जागा अजित पवार गटाला देऊन भाजपने धैर्यशील पाटील यांचा पोपट केला, अशीच चर्चा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;