छत्रपती संभाजीनगरात इमारत पेटली; गुदमरून 7 ठार, ई-बाईकमुळे आग लागल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगरात इमारत पेटली; गुदमरून 7 ठार, ई-बाईकमुळे आग लागल्याचा संशय

छत्रपती संभाजी नगर येथे एका इमारतीला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत गुदमरून सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या आगीत तीन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ई-बाईकमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पहाटे चारच्या सुमारास इमारतीतील एका टेलरिंगच्या दुकानाला आग लागल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यात यश मिळविलं, मात्र तोपर्यंत सात जणांचा आग आणि धुरामुळे मृत्यू झाला होता.

संभाजी नगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितलं की, आग आलम टेलर्सच्या दुकानात लागली. इमारतीच्या वरच्या मजल्यावर रहिवासी राहत होते. आग त्या राहत्या जागेपर्यंत पोहोचली नसली तरी, पीडितांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला असावा असा संशय आहे.

मृतांची नावे

1. आसीम वशीम शेख (वय 3 वर्ष)
2. परी वशीम शेख (वय 2 वर्ष)
3. वशीम शेख अब्दुल अजीज (वय 30 वर्ष)
4. तनवीर वशीम शेख (वय 23 वर्ष)
5. हमीदा बेगम अब्दुल अजीज (वय वर्ष 50 वर्ष)
6. शेख सोहेल अब्दुल अजीज (वय 35 वर्ष)
7. रेशमा शेख सोहेल शेख (वय 22 वर्ष)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;