लंकन संघाची वाटचाल मालिका विजयाकडे

लंकन संघाची वाटचाल मालिका विजयाकडे

बांगलादेश पराभवाच्या छायेत : मोमिनुल हकचे अर्धशतक

वृत्तसंस्था/ चेतोग्राम

दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर लंकेचा संघ मालिका विजयाकडे वाटचाल करीत आहे. या सामन्यात बांगलादेशला निर्णायक विजयासाठी लंकेने 511 धावांचे कठीण आव्हान दिल्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात दिवसअखेर 7 बाद 268 धावा जमविल्या. या कसोटीतील बुधवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 243 धावांची गरज असून त्यांचे केवळ 3 गडी खेळावयाचे आहेत. मोमिनुल हकने चिवट फलंदाजी करत अर्धशतक झळकाविले.

या सामन्यात लंकेने पहिल्या डावात 531 धावा जमविल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 178 धावांत आटोपला. लंकेने पहिल्या डावात 353 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी 6 बाद 102 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि 40 षटकाअखेर 7 बाद 157 धावांवर डावाची घोषणा केली. लंकेच्या दुसऱ्या डावात मधुष्काने 34 तर मॅथ्यूजने 5 चौकारांसह 56, जयसूर्याने 2 चौकारांसह नाबाद 28 धावा जमविल्या. बांगलादेशच्या हसन मेहमूदने 65 धावांत 4 तर खलिद अहमदने 2 व शकिब अल हसनने 1 गडी बाद केला.

बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण लंकेकडून मिळालेल्या आव्हानासमोर बांगलादेशची फलंदाजी दडपणाखाली झाली. मोमिनुल हकने 56 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 50 धावा जमविल्या. मेहमुद्दुल हसन जॉयने 3 चौकारांसह 24, झाकिर हसनने 2 चौकारांसह 19, कर्णधार शांतोने 2 चौकारांसह 20, शकिब अल हसनने 3 चौकारांसह 36, लिटॉन दासने 4 चौकारांसह 38, शहदात हुसेनने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. मेहदी हसन मिराज 7 चौकारांसह 44 तर ताजुल इस्लाम 2 चौकारांसह 10 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे कुमारा, प्रभात जयसूर्या आणि कमिंदू मेंडीस यांनी प्रत्येकी 2 तर विश्वा फर्नांडोने 1 गडी बाद केला.

मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी मॅथ्यूजचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लंकेने आपला दुसरा डाव घोषित केला. उपहारापर्यंत बांगलादेशने दुसऱ्या डावात बिनबाद 31 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या दुसऱ्या सत्रात बांगलादेशने 101 धावांमध्ये 4 गडी गमविले. चहापानावेळी बांगलादेशने दुसऱ्या डावात 34 षटकात 4 बाद 132 धावा जमविल्या होत्या. मात्र शेवटच्या सत्रामध्ये बांगलादेशकडून चिवट फलंदाजी झाली. या सत्रामध्ये बांगलादेशने 136 धावा जमविताना 3 गडी गमविले.

संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव 531, बांगलादेश प. डाव 178, लंका दु. डाव 7 बाद 157 डाव घोषित (मॅथ्यूज 56, जयसूर्या नाबाद 28, मदुष्का 34, हसन मेहमुद 4-65, खलिद अहमद 2-34, शकिब अल हसन 1-39), बांगलादेश दु. डाव 67 षटकात 7 बाद 268 (मोमिनुल हक 50, शकिब अल हसन 36, लिटॉन दास 38, मेहदी हसन मिराज खेळत आहे 44, शांतो 20, जॉय 24, झाकिर हसन 19, टी. इस्लाम खेळत आहे 10, कुमारा, कमिंदू मेंडीस, जयसूर्या प्रत्येकी 2 बळी, विश्वा फर्नांडो 1-39).

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;