धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या किमती ऐवजाची चोरी
बेस्ट बसमध्ये होणाऱया गर्दीचा फायदा उचलत प्रवाशांच्या पर्स अथवा बॅगेतील किमती ऐवज शिताफीने लंपास करणाऱया टोळीचा एक सराईत आरोपी आझाद मैदान पोलिसांच्या हाती लागला आहे. त्या चोराकडून एका गुह्यातील चार लाख 48 हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळाले आहे. कुलाबा बस डेपो ते डी. एन. मार्गावरील पी.के. वाईनसमोरील बस स्टॉपदरम्यान चोरी झाली. वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि लीलाधर पाटील तसेच कटरे, हिरे, पाटील, कीर्तिकर, मुंढे या पथकाने तपास केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List