नोकरीच्या नावाखाली करायचा फसवणूक
नोकरीच्या नावाखाली तरुणीला विमानतळ परिसरात बोलावून तिचा मोबाईल आणि पैसे घेऊन पळून गेलेल्याला अखेर विमानतळ पोलिसांनी अटक केली. संदीप जाणवलकर असे त्याचे नाव आहे. सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्राने तरुणीला नोकरीचे आमिष दाखवले. मित्राचा तथाकथित भाऊ बीकेसीत भेटेल आणि नोकरीची माहिती देईल, असे सांगितले. बीकेसीत त्या तरुणाबरोबर धारावीतील तरुणी आंतरदेशीय विमानतळ टर्मिनस येथे आली. विमानतळावर जाताना मोबाईल आणि सोने घेऊन जाऊ शकत नाही अशी बतावणी केली. तरुणीने मोबाईल आणि सोने दिल्यानंतर तो तरुण गाडी घेऊन पसार झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List