आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये फेरबदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील 2 सामन्यांच्या तारखांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील तसेच गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स संघातील सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 17 एप्रिल रोजी कोलकाता येथे होणाऱ्या सामन्याच्या दिवशी रामनवमी आहे. त्यामुळे हा सामना 1 दिवस अगोदर म्हणजे 16 एप्रिल रोजी खेळविला जाईल. त्याचप्रमाणे गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील 17 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये होणारा सामना 16 एप्रिल रोजी खेळविला जाईल, अशी माहिती आयपीएल आयोजकांनी दिली आहे. 17 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यावेळी कोलकाता पोलिस खात्याने आपण पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्यास असमर्थ असल्याचे कळविल्याने हा फेरबदल करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली. यजमान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा घरच्या मैदानावरील हा त्यांचा तिसरा सामना राहिल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List