उद्धव ठाकरेंची ताकद काय ते आता शिंदेंना कळत असेल; अंबादास दानवे यांनी सुनावलं

उद्धव ठाकरेंची ताकद काय ते आता शिंदेंना कळत असेल; अंबादास दानवे यांनी सुनावलं

Lok Sabha Election 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपांवरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. बैठकांवर बैठकांचं सत्र सुरू असलं तरी देखील तिढा काही सुटताना दिसत नाही. भाजपनं मिंधे गटाची चांगलीच गोची केल्याचं चित्र आहे. मिंधे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा मुलगा आणि कल्याण मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना अद्याप उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. यामुळे मिंधे गटाची चांगलीच दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपमात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून सर्वाधिक जागांवर भाजपच कशी लढणार यासाठी संपूर्ण जोर लावत आहे. यावरून एकेकाळी आपल्या मुलाची उमेदवारी सहज घेऊन येणाऱ्या शिंदे यांच्यास्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी लक्ष्य केलं आहे.

शिवसेनाप्रमुख आणि आता उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व किती दमाचं आहे हे आता शिंदेंना कळत असेल. या भाजपला ते वाकवत होते, झुकवत होते आणि आता तर शिंदेंना त्यांच्या स्वत:च्या मुलाची उमेदवारी त्यांना जाहीर करता आली नाही, जी त्यांच्या हक्काची होती. बाकी संभाजीनगर तर फार लांब आहे. स्वत:चा मुलगा विद्यमान खासदार आहे असं असताना देखील त्यांना उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. याचा अर्थ भाजप कशी वागते आणि या भाजपला उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व कसं वाकवत होतं हे त्यांना कळत असेल, असं सुनावलं. तसंच नेतृत्त्व करणं सोपं नसतं, याची जाणिव देखील करून दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;