मालिकेतल्या सहकलाकाराशी अफेअर पडणार महागात; निर्मात्यांकडून करारात ‘हा’ खास नियम समाविष्ट

मालिकेतल्या सहकलाकाराशी अफेअर पडणार महागात; निर्मात्यांकडून करारात ‘हा’ खास नियम समाविष्ट

स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. नुकतंच या मालिकेतून दोन मुख्य कलाकारांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे हो दोघं या मालिकेत रुही आणि अरमानची मुख्य भूमिका साकारायचे. मात्र सेटवरील त्यांचं वागणं, कामाप्रती अप्रामाणिकता आणि एकमेकांसोबत असलेल्या अफेअरमुळे कामाकडे नीट लक्ष न देणं, मेकअप रुममध्ये तासनतास घालवणं यांसारख्या तक्रारींमुळे निर्मात्यांनी त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला. सेटवर दोघांचे खूप नखरे असायचे, अशाही तक्रारी काही सहकलाकारांनी केल्या होत्या. म्हणूनच निर्माते राजन शाही यांनी थेट त्यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला. आता या मालिकेत नव्या कलाकारांची एण्ट्री झाली आहे. पण पुन्हा त्याच घटना घडू नयेत यासाठी निर्मात्यांनी विशेष काळजी घेतली आहे. त्यांनी नव्या कलाकारांच्या करारात ‘नो अफेअर क्लॉज’ समाविष्ट केला आहे. ज्यामुळे मालिकेत काम करणारे कलाकार एकमेकांना डेट करू शकत नाहीत.

‘ये रिश्ता..’मध्ये शहजादा धामीची जागा घेणारा अभिनेता रोहित पुरोहितने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याच्याही करारात हा क्लॉज समाविष्ट असल्याचं त्याने म्हटलंय. रोहित म्हणाला, “मीसुद्धा या सर्व चर्चा ऐकल्या आहेत आणि माझ्या करारातही त्याचा उल्लेख आहे. पण हे कितपत यशस्वी ठरेल याचा काही नेम नाही. कारण कोणी जाणूनबुजून प्रेमात पडत नाही. कोणी जाणूनबुजून एखाद्यासोबत अफेअर किंवा रिलेशनशिपमध्ये येत आहे. तुम्ही या गोष्टीवर नियंत्रण आणू शकत नाही. या कायदेशीर बाबी झाल्या, पण वैयक्तिक पातळीवरही तुम्हाला प्रोफेशनल असणं खूप गरजेचं असतं.”

शहजादा आणि प्रतीक्षाच्या अफेअरबद्दल विचारलं असता रोहित म्हणाला की त्याने मीडिया आणि सेटवरील लोकांकडून या चर्चा ऐकल्या आहेत. “मालिकेतून काढून टाकल्याचा टॅग कोणत्याही कलाकारासाठी चांगला नसतो. त्यामुळे सेटवरील नियम मोडता कामा नये. राजन सरांनी जर इतका मोठा निर्णय घेतला आहे तर नक्कीच काहीतरी झालं असेल,” असा अंदाज त्याने व्यक्त केला. राजन शाही यांनी मुख्य भूमिकेसाठी रोहितला साइन करताना म्हटलं होतं की, असं समज जणू मी तुला माझी मुलगी सोपवत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांची जागा रोहित पुरोहित आणि गर्विता सधवानी यांनी घेतली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;