गरजच काय होती? विचित्र लिप फिलर्समुळे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून ट्रोल

गरजच काय होती? विचित्र लिप फिलर्समुळे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून ट्रोल

सौंदर्याची संकल्पना आणि त्याची मापदंडं ही बदलत्या काळानुसार बदलत आहेत. सध्या अनेक लोकांचा कल हा नैसर्गिक सौंदर्यापेक्षा ‘फेक ब्युटी’कडे वाढत चालला आहे. कलाविश्वातील अनेकांना आपण प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, लिप फिलर्स यांसारख्या गोष्टींच्या आहारी जाताना पाहिलंय. मात्र या गोष्टी प्रत्येकालाच चांगल्या दिसतील, याची खात्री नसते. सध्या अशाच लिप फिलर्समुळे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीची सून सोशल मीडियावर ट्रोल होतेय. अभिनेत्री उमा भेंडे यांची सून श्वेता महाडिक सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. श्वेता कंटेट क्रिएटर असून तिच्या ‘DIY’ व्हिडीओंना आणि कल्पनांना नेटकऱ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र श्वेताने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील तिचे ओठ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या फोटोंमध्ये श्वेताना लिप फिलर्स केल्यासारखं दिसतंय. त्यामुळे तिचे ओठ नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचे दिसत आहेत. हल्लीच्या काळात अनेक सेलिब्रिटी अशा पद्धतीचे लिप फिलर्स करताना दिसतात. मात्र श्वेताला हे फिलर्स अजिबात चांगले दिसत नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. मुळात असं काही करण्याची गरजच काय होती, असा सवाल अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये केला आहे. लिप फिलर्समुळे श्वेताने तिच्या चेहऱ्याची वाट लावून घेतली, असंही काहींनी म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Mahadik (@shwetmahadik)

या ट्रोलिंगनंतर श्वेताने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने त्या लिप फिलर्समागचं सत्य उघड केलं आहे. ‘वाईट वाटून घेऊ नका कारण 1 एप्रिल आहे. मी पहिल्यांदाच प्रोस्थेटिक लिप्स तयार करून पाहिलं. हे पाहून तुम्हाला हसू नक्कीच आलं असेल’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. श्वेता अशा विविध गोष्टी बनवून त्याचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने प्रोस्थेटिक लिप्स तयार करून पाहिले आणि त्याचा प्रयोग तिने स्वत:च्या ओठांवर केला. एपिल फूलच्या निमित्ताने तिने हे फोटो पोस्ट करून नेटकऱ्यांना चांगलंच पेचात पाडलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Mahadik (@shwetmahadik)

DIY म्हणजेच ‘डू इट युअरसेल्फ’. ही एक अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये आपलं घर सजवणं किंवा विविध गोष्टी दुरुस्त करणं, घरातील कामाच्या छोट्या-मोठ्या वस्तू स्वत: कल्पकतेने बनवणं यांचा समावेश असतो. श्वेतासुद्धा असेच काही प्रयोग करून चाहत्यांसोबत ते शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे साडेआठ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;