छत्तीसगडच्या बिजापुरमध्ये सुरक्षा दलाने केला चार नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 जण जखमी

छत्तीसगडच्या बिजापुरमध्ये सुरक्षा दलाने केला चार नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 जण जखमी

छत्तीसगड येथील बीजापुरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. या चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून 7 नक्षलवादी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाचे पथक नक्षलीविरोधी मोहिमेवर आहे. याच मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलाचे पथक बीजापूर जिल्हयातील नक्षलग्रस्त क्षेत्र गंगालूर परिसरातून जात होते. याच दरम्यान सुरक्षाजवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला तर सुरक्षा दलाच्या पथकानेही या गोळीबाराला चोख प्रत्योत्तर देत चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला. तर सात नक्षलवादी गोळ्या लागून जखमी झाले आहेत.सोमवारी छत्तीसगड आणि तेलंगाणाच्या सीमावर्ती परिसरात नक्षलवाद्यासोबत चकमक झाली होती. त्यात एक नक्षलवादी मारला गेला होता . त्यावेळी सुरक्षा दलाने घटनास्थळावरुन काही शस्त्र जप्त केली होती.

बस्तर लोकसभा जागेसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रशासन आणि पोलीस सतर्क आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;