कायम साडीत दिसणारी ‘दयाबेन’चा असा लूक पाहून चाहते हैराण, अभिनेत्रीला ओळखणं कठीण

कायम साडीत दिसणारी ‘दयाबेन’चा असा लूक पाहून चाहते हैराण, अभिनेत्रीला ओळखणं कठीण

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत कायम साडीत आणि साध्या लूकमध्ये दिसणारी दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी आता झगमगत्या विश्वापासून दूर आहे. अभिनेत्री दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता दिशा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या दिशा हिचा एक जुना व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ अभिनेत्राचा हटके आणि बोल्ड लूक पाहून चाहते देखील हैराण झाला आहे.

व्हिडीओमध्ये दिशा निळ्या रंगाचा शिमरी टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांना देखील थक्का बलली आहे. कायम गुजराती साडी आणि ज्वेलरीमध्ये दिसत असते. अशात अभिनेत्रीचा असा लूक पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. व्हायरल व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर, दिशाच्या म्यूझीक व्हिडीओचा आहे. ‘भिगरी गा..’ असं गाण्याचं नाव आहे.

दिशा वकानी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने रंगभूमीपासून सुरुवात केली. दिशा हिने गुजराती सिनेविश्वात देखील अनेक वर्ष काम केलं. 1997 मध्ये दिशा हिने मोठ्या पडद्यावर देखील काम केलं. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही. त्यानंतर दिशा हिला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दिशा हिने ‘दयाबेन’ या भूमिकेला न्याय देत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता दिशाने मालिकेचा निरोप घेतला असला तरी, तिची चर्चा होत असते. 2017 मध्ये दिशा हिने कुटुंबासाठी मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर दिशा पुन्हा पदार्पण करणार अशी चर्चा होती. पण अखेर रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याची माहिती समोर आली.

दिशा वकानी हिचं खासगी आयुष्य…

दिशा वकानी हिने 2015 मध्ये 24 नोव्हेंब 2015 मध्ये लग्न केलं. अभिनेत्री उद्योजक मयूर पाडिया यांच्यासोबत कुटुंबियांच्या इच्छेने लग्न केलं. मयूर आणि दिशा यांना दोन मुलं आहेत. 2017 मध्ये दिशाने लेकीला जन्म दिला. त्यानंतर 2022 मध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. दिशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;