बॉक्स ऑफिसवर तब्बू, करीना, क्रितीची कमाल; ‘क्रू’ने कमावले तब्बल इतके कोटी रुपये
तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'क्रू' या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला दमदार कमाई केली. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने 4.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'गुड फ्रायडे'च्या सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
'क्रू'ने पहिल्याच दिवशी 10.28 कोटी रुपयांची कमाई केली होती. सुट्टीचा या चित्रपटाला चांगला फायदा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10.87 आणि तिसऱ्या दिवशी 11.45 कोटी रुपयांची कमाई झाली. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने भारतात 36 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. पहिल्या वीकेंडपर्यंत जगभरात या चित्रपटाने 62 कोटी रुपये कमावले. सोमवारच्या कमाईचा आकडा समाविष्ट केल्यास 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला या चित्रपटाने जमवला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List