अर्जुन-सलमानच्या वादावर पहिल्यांदाच व्यक्त झाले वडील बोनी कपूर; म्हणाले “सलमानमुळेच अर्जुनने..”

अर्जुन-सलमानच्या वादावर पहिल्यांदाच व्यक्त झाले वडील बोनी कपूर; म्हणाले “सलमानमुळेच अर्जुनने..”

अभिनेता अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्यात आता वितुष्ट आलं जरी असलं तरी एकेकाळी या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. अर्जुन सध्या अभिनेत्री मलायका अरोराला डेट करतोय. मलायका ही अरबाज खानची पूर्व पत्नी आणि सलमानची पूर्व वहिनी होती. मलायकासोबतच्या नात्यामुळे अर्जुन आणि सलमानच्या मैत्रीत फूट निर्माण झाली. असं असलं तरी अर्जुनला अभिनेता म्हणून घडवण्याचं श्रेय हे सलमानलाच जातं, असं खुद्द त्याचे वडील बोनी कपूर म्हणाले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते अर्जुन आणि सलमानमधल्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. त्याचप्रमाणे अर्जुनसोबतच्या मैत्रीत कटुता आल्याने सलमानसोबतच्या नात्यात काही फरक काही पडला का, याचंही उत्तर त्यांनी दिलं.

या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, “मी मोनाशी (पहिली पत्नी) विभक्त झालो असलो तरी अर्जुनला अभिनेता व्हायचंय हे कधीच माझ्या डोक्यात आलं नव्हतं. मला खरंतर सलमान खानने फोन केला होता आणि तो म्हणाला की, अर्जुन अभिनेता होईल. यासाठी स्वत: सलमानने त्याच्याकडून सर्वकाही करून घेतलं. सलमानमुळेच अर्जुनने वजन कमी केलं होतं. त्यावेळी अर्जुनचं वजन खूप जास्त होतं.”

“अर्जुन आज ज्याठिकाणी आहे, त्यासाठी मी सलमानला श्रेय देईन. आज जे काही बोललं किंवा केलं जातं, कदाचित त्या दोघांमध्ये चांगलं नातं नाही. म्हणजे त्या दोघांचं समीकरण आता पहिल्याप्रमाणे राहिलं नाही. पण सलमानने अर्जुनसाठी बरेच प्रयत्न केले. अर्जुनची प्रगती ही बऱ्याच अंशी सलमानने प्रभावित होती. मग त्याचं दिसणं असो, अभिनय असो, चित्रपटांची निवड असो.. सलमाननेच त्याला घडवलंय. चांगलं शरीर असण्यामागचं महत्त्व काय असतं, हे सलमानने अर्जुनच्या मनात बिंबवलं,” असं बोनी कपूर यांनी सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्यातील कटुतेचा परिणाम तुमच्यासोबतच्या नात्यात झाला का, असा प्रश्न विचारल्यावर ते पुढे म्हणाले, “ते कधीच बदललं नाही. माझं आजही सलमानवर खूप प्रेम आहे. मला असं वाटतं की त्याच्यासारखे लोक खूप कमी असतात. त्याच्याइतका मोठ्या मनाचा, प्रेमळ माणूस सापडणार नाही. तो माझा खूप आदर करतो.”

अर्जुन आणि सलमान यांच्यात एकेकाळी खूप चांगली मैत्री होती. मात्र मलायकामुळे या दोघांच्या मैत्रीत कटुता आली. त्यामुळे आजही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कधी सलमान आणि अर्जुन एकमेकांसमोर आले, तरी ते दुर्लक्षच करतात. नुकत्याच एका पार्टीत सलमानने बाजूलाच उभ्या असलेल्या अर्जुनकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;