प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स करून घ्या पण..; करण जोहरने कोणावर साधला निशाणा?

प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स करून घ्या पण..; करण जोहरने कोणावर साधला निशाणा?

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या एका पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. सोमवारी करणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली. या पोस्टद्वारे त्याने फिलर्स, प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. कितीही सर्जरी किंवा बोटॉक्स केले तरी मूळ आत्मा बदलू शकत नाही, असं त्याने म्हटलंय. त्यामुळे करणची ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. करण पहिल्यांदाज ‘फेक ब्युटी’बद्दल अशाप्रकारे व्यक्त झाला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत सौंदर्याला प्रचंड महत्त्व असतं. त्यामुळे आजकाल अनेक कलाकार प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, फिलर्स यांच्या मदतीने रंगरुपात बदल आणण्याचा प्रयत्न करतात. काहींच्या बाबतीत हा प्रयत्न यशस्वी ठरतो, तर काहीजण त्यामुळे आणखी वाईट दिसू लागतात.

करण जोहरची पोस्ट-

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये करणने लिहिलंय, ‘फिलर्स लावल्याने पूर्तता येत नाही. मेकअप लावल्याने वय कमी होत नाही. करून घ्या जितके बोटॉक्स करायचे आहेत, एखाद्या मधमाशीने चावल्यासारखेच दिसाल. नाक बदलल्याने घाणेरडा वास अत्तर बनत नाही. प्लास्टिक सर्जरीने तुमचं बाहेरील रुप बदलूही शकतं, पण मेरी जान.. मूळ आत्मा बदलत नाही.’ करणची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

करण जोहरने अशाप्रकारची पोस्ट लिहायची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी गेल्या वर्षी मे महिन्यात त्याने वेळेची किंमत समजण्यावरून पोस्ट लिहिली होती. ‘वक्तशीरपणाबद्दल एक कमालीची बाब म्हणजे याच्यासाठी नैसर्गिक प्रतिभा असणं, डिग्री असणं किंवा आई-वडिलांच्या मंजुरीची गरज नसते. ही कोणती कला नाही, जी आपल्याला वारसाने मिळेल. हा सर्वसामान्य शिष्टाचार आहे. जो इतर लोकांच्या वेळेचा आदर करतो, त्याचा आदर आपोआप होतो’, असं त्याने लिहिलं होतं.

करण जोहरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;