अतुल परचुरेंचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव, म्हणाले, कॅन्सर झाला तेव्हा वाटतच नव्हतं की…

अतुल परचुरेंचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव, म्हणाले, कॅन्सर झाला तेव्हा वाटतच नव्हतं की…

मालिका, नाटक, चित्रपट… या सगळ्याच माध्यमात अतुल परचुरे हे नाव उठून दिसतं. त्यांच्या कामाची वेगळी छाप ते प्रेक्षकांच्या मनावर उमटवत असतात. सगळं काही सुरळित सुरु असतानाच अचानकपणे अतुल परचुरे यांच्या आयुष्यात एक आजाररूपी संकट आलं. काही दिवसांआधी त्यांना कॅन्सर झाला होता. यावेळी त्यांना कठीण प्रसंगातून जावं लागलं. पण त्या गंभीर आजारावर मात करत अतुर परचुरे जिद्दीने पुन्हा उभे राहिले. पण कॅन्सर झाल्याचं कळल तो काळ आणि नंतर उपचारांच्या काळात त्यांना कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. हा अनुभव त्यांनी एका पुरस्कार सोहळ्यात सांगितला.

अतुल परचुरे यांचा कटू अनुभव

एका पुरस्कार सोहळ्यात अतुल परचुरे यांनी कॅन्सरवरील उपचारांदरम्यानचा अनुभव सांगितला.  इथून मागे बरोबर एक वर्षापूर्वी मी पुन्हा उभा राहू शकेन की नाही? याची मला स्वत:लाही गॅरंटी नव्हती. पण, आज मी इथे उभा आहे तो फक्त तुमच्यामुळे मी उभा आहे, असं अतुल परचुरे यांनी म्हटलं. यावेळी उपस्थित कलाकारांचे डोळे पाणवले. यावेळी अतुल परचुरे यांनी रंगमंचावर डोकं टेकवत आभार मानले. या प्रसंगी सुनील बर्वे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर हे देखील मंचावर उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तेव्हा झालं कॅन्सरचं निदान

अतुल परचुरे यांना मागच्या वर्षी कॅन्सरचं निदान झालं. लग्नाचा 25 वा वाढदिवस होता, म्हणून ते कुटुंबासोबत न्यूझीलँडला गेले होते. तिथे जेवताना त्यांना वारंवार उल्टीसारखं वाटू लागलं. बाकी सगळं ठीक होतं. पण खाताना त्यांना वारंवार उल्टीसारखं व्हायचं. आधी त्यांना वाटलं कावीळ झाली असावी. मग तिथं एका डॉक्टरला दाखवलं. तेव्हा अल्ट्रा सोनोग्राफी केली. तेव्हा कळालं की कावीळ पेक्षा काहीतरी गंभीर आजार आहे.

अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत त्यांचा अनुभव सांगितला. लिव्हरमध्ये ट्युमर दिसत होता. तो ट्युमर साधारण पाच सेमीचा आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. मी तेव्हा त्यांना विचारलं की म्हणजे कॅन्सर झाला आहे का? तर डॉक्टरांनी कॅन्सर आहे, असं सांगितलं. मी यातून बाहेर पडू शकतो का?, असं डॉक्टरांना विचारलं. तेव्हातू बाहेर पडशील.तुला कॅन्सर स्पेशलिस्टची मदत घे सांगितलं. नंतर उपचार झाले. अन् मी बरा झालो, असं अतुल परचुरे यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;