455 धावांसह लंकेची स्थिती भक्कम

असिता फर्नांडो : 34 धावांत 4 बळी, हसन महेमूद : 51 धावांत 4 बळी

वृत्तसंस्था / चेतोग्राम

यजमान बांगलादेश आणि लंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर लंकन संघाने 455 धावांची भक्कम आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या मालिकेत लंकेने पहिली कसोटी जिंकून यापूर्वीच आघाडी घेतली असून आता ते बांगलादेशचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या सामन्यात लंकन संघाने पहिल्या डावात 531 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर बांगलादेश संघाने 1 बाद 55 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 178 धावांत आटोपला. बांगलादेश संघाच्या पहिल्या डावात झाकिर हसनने 8 चौकारांसह 54, मेहमुद्दुल जॉयने 3 चौकारांसह 21, ताजुल इस्लामने 1 चौकारासह 22 तर मोमिनुल हकने 3 चौकारांसह 33 धावा जमविल्या. अनुभवी शकिब अल हसन 1 चौकारासह 15 धावांवर बाद झाला. लंकेतर्फे आशिता फर्नांडो सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 34 धावांत 4 गडी बाद केले. विश्वा फर्नांडो, कुमारा आणि प्रभात जयसूर्या यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. लंकेने पहिल्या डावात 353 धावांची आघाडी घेतली असली तरी त्यांनी बांगलादेशला उपलब्ध असूनही फॉलोऑन दिला नाही. लंकेने दुसऱ्या डावात जलद फलंदाजी करण्याच्या नादात गडी गमाविले. दिवसअखेर लंकेने दुसऱ्या डावात 25 षटकात 6 बाद 102 धावा जमविल्या. मधुष्काने 5 चौकारांसह 34 धावा केल्या. मूथ्यूज 3 चौकारांसह 39 धावांवर खेळत आहे. बांगलादेशतर्फे हसन मेहमुदने 51 धावांत 4 तर खलिद अहमदने 29 धावांत 2 गडी बाद केले. या कसोटीतील खेळाचे 2 दिवस बाकी असून बांगलादेशचा संघ मोठ्या पराभवाच्या छायेत वावरत आहे.

संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव सर्वबाद 531, बांगलादेश प. डाव सर्वबाद 178 (झाकीर हसन 54, मेहमुद्दुल जॉय 21, तैजुल इस्लाम 22, मोमिनुल हक 33, शकिब अल हसन 15, असिता फर्नांडो 4-34, विश्वा फर्नांडो 2-38, कुमारा 2-19, जयसूर्या 2-65), लंका दु. डाव 25 षटकात 6 बाद 102 (मदुष्का 34, मॅथ्यूज खेळत आहे 39, हसन मेहमुद 4-51, खलिद अहमद 2-29).

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;