हेरॉईन ड्रग्ज विकण्याच्या तयारीत असलेला पेडलर गजाआड, 54 लाखांचे 270 ग्रॅम ड्रग्ज जप्त

हेरॉईन ड्रग्ज विकण्याच्या तयारीत असलेला पेडलर गजाआड, 54 लाखांचे 270 ग्रॅम ड्रग्ज जप्त

माहीमच्या रहेजा उड्डाणपुलावर हेरॉईन ड्रग्ज विकण्यासाठी आलेला एक 25 वर्षीय पेडलर शाहूनगर पोलिसांच्या लागला आहे. त्या पेडलरकडून 54 लाख रुपये किमतीचा हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

शाहूनगर पोलिसांचे पथक रविवारी रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना शीव-माहीम लिंक रोडवरील रहेजा उड्डाणपुलावर एक तरुण संशयास्पद हालचाल करताना पथकाच्या नजरेस पडला. पोलिसांना बघून तो मागे फिरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे पथकाने त्याला वेळीच रोखले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 270 ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज, सरफराज अहमद नावाचे आधार व पॅनकार्ड, एक मोबाईल व पाच हजारांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. त्याने हा हेरॉईनचा साठा कोठून आणला होता तसेच ते तो कोणाला विकणार होता याचा शाहूनगर पोलीस शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;