शाखा क्रमांक 147 मध्ये महिला शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन, अनिल देसाई यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले

शाखा क्रमांक 147 मध्ये महिला शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन, अनिल देसाई यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विभाग क्रमांक नऊचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि महिला विभाग संघटिका पद्मा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका अंजली नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शाखा क्रमांक 147 मध्ये महिला शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर मशाल हाती घेत सर्वांनी मोठय़ा जल्लोषाने लोकसभेचे दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.

या वेळी उपविभागप्रमुख राजेंद्र पोळ, महिला अणुशक्तीनगर विधानसभा समन्वयक नेमाडे, रेणुका टोपकर, उपविभाग संघटिका विद्या पालांडे, विधानसभा समन्वयक अंबादास काटकर, शाखाप्रमुख गणेश पाटील, शाखा समन्वयक रूपेश गावकर, महिला शाखा संघटक दुर्गा ढगे, शाखा समन्वयक छाया साळुंखे यांच्यासह सर्व उपशाखाप्रमुख, महिला गटप्रमुख, शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;