बिहारमध्ये जीतन राम मांझी यांची परीक्षा
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि त्यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) या पक्षाची मोठी परीक्षा असणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला गया, औरंगाबाद, नवादा आणि जुमई या चार जागांवर मतदान होणार आहे. यातील लोकसभेच्या तीन जागांवर मांझी यांच्या पक्षाचे सर्व चार आमदार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱया इमामगंज येथून जीतन राम मांझी स्वतः आमदार आहेत. दरम्यान, गेल्या निवडणुकीत मांझी यांना या मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. मोदी लाटेत हिंदुस्थानी अवाम मोर्चा एकही जागा जिंकू शकली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List