ओदिशातही भाजपचे फोडाफोडीचे राजकारण; बिजू जनता दलचे मोहंती भाजपात दाखल

ओदिशातही भाजपचे फोडाफोडीचे राजकारण; बिजू जनता दलचे मोहंती भाजपात दाखल

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव होण्याच्या भीतीने भाजपने ठिकठिकाणी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. ओदिशातील केंद्रपाडा येथील अभिनेते आणि बिजू जनता दलाचे खासदार अनुभव मोहंती यांनी बिजू जनता दलाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला आहे. 2019 मध्ये बिजू जनता दलाच्या तिकिटावर खासदार होणारे मोहंती हे राज्यसभा सदस्य होते. आपली बीजेडीत घुसमट होतेय याचा साक्षात्कार त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

भाजपात सामील होताच मोहंती यांनी मोदी सरकारची तोंड भरू प्रशंसा केली. गेल्या पाच वर्षांत तीन तलाक कायद्याला तिलांजली आणि नव्या गुन्हेगारी कायद्यासह अनेक ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचा आपल्याला अभिमान आहे, अशा शब्दांत मोहंती यांनी मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. विकसित हिंदुस्थानसाठी मोदींना समर्थन देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;